महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणाची आजपासून सुरुवात झालीय. गणरायाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्र अगदी फुलून गेलाय. पण महाराष्ट्रात कोणताही सण असो किंवा कोणतही कार्य सोन्याशिवाय ते अपूर्णच वाटत. मुंबईत सोन्यामध्ये दिवसाला अंदाजे दोनशे कोटींची उलाढाल होते. गणेशोत्सवामुळे हीच उलाढाल आता दुप्पट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय. मुंबईमध्ये जी दिवसाला सोन्यामध्ये ४०० कोटींची उलाढाल होईल असा अंदाज लावला जातोय तसाच महाराष्ट्रात तब्बल १ हजार कोटींची सोन्यामध्ये उलाढाल होईल असं म्हटलं जातंय.
The biggest festival of Maharashtra has started from today. But any festival or any function in Maharashtra seems incomplete without gold. There is a daily turnover of approximately two hundred crores in gold in Mumbai. Due to Ganeshotsav, it is estimated that this turnover will double now. It is estimated that there will be a turnover of 400 crores in gold per day in Mumbai, similarly it is said that there will be a turnover of around 1000 crores in gold in Maharashtra.