एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. आमदारांचा हा गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढत गेला. आता त्यात आणखी मोठी दरी निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी नुकतचं त्यांच्या कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो काढला असून त्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावलाय.