संशयित वाल्मीक कराड हा पुण्यात सीआयडी ऑफिसला शरण गेला आणि इथून पुढे आता पोलीस कारवाईला सुरुवात झालेली आहे. या सगळ्या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थोडक्यात एक गोष्ट सांगितलेली आहे की या प्रकरणांमध्ये आपण कुणालाही सोडणार नाही हा स्पष्ट इशारा त्यांनी ज्यांना द्यायचा आहे त्यांना दिलेला आहे आणि तो त्यांना समजेल अशा भाषेमध्ये दिलेला आहे.