नंदीग्राम पुन्हा ममतांना तारणार का?

Will Nandigram save Mamata again? | नंदीग्राम पुन्हा ममतांना तारणार का?

ममता बॅनर्जी यांनी २०२१ ची निवडणूक नंदीग्राममधून लढण्याचे घोषित केले आहे. नंदीग्राम हा सुवेंदू अधिकारींचा मतदार संघ आहे. “ममता बॅनर्जींना ५० हजार पेक्षा जास्त फरकाने हरवले नाही तर राजकारण सोडीन.” अशी घोषणा सुवेंदू अधिकारींनी केली आहे. सुवेंदू अधिकारी हे डिसेंबर महिन्यातच तृणमूल पक्ष सोडून भाजपा मध्ये आले आहेत. ममता बॅनर्जींनी सुवेंदूंना गद्दार ठरवले आहे आणि आता त्या, सुवेन्दुना सुवेन्दुच्याच मतदारसंघात आव्हान देणार आहेत.

ममता बॅनर्जींचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूर मतदारसंघात जवळपास ५०% मतदार हे गुजराती आणि मारवाडी व्यापारी आहेत. ममता बॅनर्जी अमित शहांना आणि पर्यायाने भाजपाला परप्रांतीय ठरवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा प्रचारात तथाकथित परप्रांतीय मतदार आपल्याला मतदान करतील का? असा प्रश्न ममता दीदींच्या मनात आला असावा. शिवाय भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बंगाल दौऱ्यादरम्यानच भवानीपूरला भेट दिली होती. भवानीपूर मध्ये ममतांना प्रचारासाठी अडकवून ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

नंदीग्रामध्ये ३०-३५% मुस्लीम मतदार आहेत. ममता बॅनर्जींसाठी ही जमीन सुपीक आहे. त्यामुळे ममतांनी ही जागा निवडली आहे.

या विषयाबद्दल अधिक माहिती या व्हिडिओमध्ये जरूर पहा.

 

Exit mobile version