संजय राऊत जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत घराबाहेर आले तेव्हाही त्यांनी अगदी भगवी शाल फडकवून दाखवली. यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा संजय राऊतांवर सडकून टीका केलीये. भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ बोंबाबोंब करा पण भगवा झेंडा नका नाचवू. हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. भगव्याचा इतका अपमान कुणी केला नसेल. संजय राऊत यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे भगव्याचा अपमान का ?