आपल्या वडिलांचे नाव वापरू नका, असा दम शिवसेना सोडलेल्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. पण बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ही उद्धव ठाकरे यांची खासगी मालमत्ता आहे का, तसे असेल तर मग महापौर बंगल्यातील बाळासाहेबांचे स्मारक उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खर्चाने का उभारू नये, असे प्रश्न विचारले जात आहेत.