सुसज्ज, सुसाट ‘ वंदे भारत

सुसज्ज, सुसाट ' वंदे भारत ' | Vande Bharat Express |  Narendra Modi | Bullet Train | Santosh Kale |

अहमदाबाद ते मुंबई दरम्यान अतिवेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या सर्वात महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे . केवळ बुलेट ट्रेनच नाही तर देशातील लांबपल्ल्यांच्या गाड्यांचा वेग वाढवणे. प्रवाशांना जलद आणि सुखावह प्रवासाचा अनुभव देण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी ह्या शहरांदरम्यान धावली. या एक्सप्रेसच्या वेगाला एक नवा आ याम देण्यासाठी पंजाबमधील न्यू माेरिंडा ते साहनेवाल या दरम्यान १९ ते २७ ऑगस्ट दरम्यान विशेष चाचणी घेण्यात येत आहे. ही चाचणीच्या पहिल्या दिवशी ताशी ९० किलाेमीटर,१०५ आणि ११५ किलाेमीटर वेगाने धावली. मालगाड्यांच्या मालवाहतुकीतही नवे बदल घडत आहेत भारतीय रेल्वेच्या ‘सुपर वासुकी’ नावाच्या मालवाहू ट्रेनने नवीन विक्रम प्रस्थापित केला. एक सलग २९५ डबे असलेल्या ‘सुपर वासुकी’च्या ६ ताकदवान इंजिनांनी परवाच्या प्रवासात २६,००० टन किलो कोळसा वाहून नेला. येणाऱ्या काळात सुखावह वेगवान प्रवासाबराेबर देशातील मालवाहतुकीला माेठ्या प्रमाणावर चालना मिळण्यास मदत हाेणार आहे.

Exit mobile version