देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहीम जाहीर केली तर त्यावरही टीका झाली. हर घर तिरंगामुळे रोजगार वाढणार का वगैरे म्हणण्यात आले. पण मोहीम थांबली नाही हर घर तिरंगा मोहीमेच्या आधी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी १५० ते २०० कोटी रुपयांपर्यंतच वार्षिक विक्री मर्यादीत होती. परंतु हर घर तिरंगा मोहीमेनंतर या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली . यंदाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ३० कोटी ध्वजांची विक्री झाली व त्यातून ५०० कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाली असल्याचं कॉन्फडरेशन ऑफ ऑ लल इंडिया ट्रेडर्स या संस्थेने केलेल्या एका पाहणीमध्ये दिसून आलं आहे.