काल विधानसभेत शिंदे- फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केलं आणि त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे ऍक्शन मोडमध्ये आले. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आपल्याला केवळ ऑनलाईन माध्यमातून दिसले. त्यामुळे राज्यातली जनता हे विसरून गेलीये की मुख्यमंत्री दौरेसुद्धा करतात. पण नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्याकडे जबाबदारी आल्याआल्याच कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा स्वभाव पाहता एकनाथ शिंदे हे संयमी असल्याचं चित्र आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या ऍक्शन मोडमुळे जनतेला नक्कीच दिलासा मिळणार असल्याची भावना आता नागरिकांमध्ये आहे. गेले अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांना केवळ ऑनलाईन पाहण्याची सवय होती. मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत याविषयीच्या चर्चा तर नव्हत्याच पण मुख्यमंत्री मंत्रालयात गेलेत यावर हेडलाईन्स बनत होत्या. या प्रथा मोडून काढण्याची ताकद आणि हे चित्र बदलण्याची क्षमता एकनाथ शिंदेंमध्ये असल्याचं दिसून येतंय.