तिरंगा तोय बदललेल्या काश्मीरची ग्वाही एका इमारतीमध्ये मुस्लिम तरुण जमले आहेत बर थोडे थोडेके नाही तर इमारतीचे तिन्ही मजले तरुणांनी व्यापून गेले आहेत. हे सर्व तरुण लयबद्धरित्या एका रांगेत उभे आहेत प्रत्येकाच्या हातात तिरंगा फडकतोय. या सर्व तरुणांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ओसंडून वाहतोय. शिक्षक माइक वर सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुल है इसकी ये गुल सीता हमारा हे देशभक्तीपर गाणं गात आहेत. शिक्षकांच्या पाठोपाठ एक सूर एक तालामध्ये गात या तरुणांच्या राष्ट्रभक्ती गीताने आसमंत दुमदूमन गेला असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतंय हे दृष्य अन्य कुठले नाही तर जम्मू- काश्मीरच्या पुंछ भागातील आहे. या पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा हातात घेणे तर सोडाच पण त्याविषयी बोलण्याची हिंमत होत नव्हती. दहशतीचा माहोल अवघ्या काश्मीरमध्ये होता. काश्मीरी पंडित होणारे हल्ले, त्यांच्यावरील अनन्वित अत्याचार याबद्दलही हिंदू संघटना सोडल्या तर कोणी व्यक्त होत नव्हतं. पण आज ही तरुण मुले- मुलीच नाहीत तर संपूर्ण खोऱ्यातील नागरिकांच्या हृदयात तिरंग्याने घर केले आहे. दहशतमुक्त वातावरणात स्वातंत्र्य दिनाच्या आधीच जागोजागी तिरंगा डौलाने फडकताना दिसतोय.