25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानशरजीलसमोर नांगी टाकणाऱ्या शिवसेनेची गुंडगिरी

शरजीलसमोर नांगी टाकणाऱ्या शिवसेनेची गुंडगिरी

Related

पंढरपूरमध्ये शिवसैनिकांकडून शिरीष काटेकर या भाजपा कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. शिवसैनिकांच्या सांगण्यानुसार काटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ही टीका सहन न झाल्याने शिवसैनिकांकडून या कार्यकर्त्याच्या तोंडाला काळे फासण्यात आले, त्याला बांगड्यांचा हार घालण्यात आला आणि साडी डोक्यावर घातली.

५ फेब्रुवारीला भाजपाने राज्यभरात वीज बिल माफ करण्यावरून आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी काटेकर यांच्यावर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर टीका नेल्याचा आरोप केला आणि पुढील प्रकार घडला.

जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला गेला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला गेला तेंव्हा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करत, सेनेनी बांगड्या भरल्या आहेत का? असा सवाल केला होता. तेंव्हा आदित्य ठाकरे यांनी ‘लिबरल’ भूमिका घेत बांगड्या भरण्यात काहीच गैर नाही असे विधान केले होते. आता मात्र शिवसैनिकांनीच भाजपा  कार्यकर्त्याला बांगड्यांचा हार घातला आणि डोक्यावर साडी देखील घातली. या प्रकरणावर मात्र आता आदित्य ठाकरे गप्प आहेत.

अशा पद्धतीने राजकीय विरोधकांना मारहाण करण्याची जुनी परंपरा आहे. यामध्ये २०२० मध्ये निवृत्त नौदल अधिकाऱ्याला देखील शिवसैनिकांनी मारहाण केली होती. अशा पद्धतीने गुंडगिरी करणाऱ्या शिवसेनेचा दुटप्पीपणा पाहण्यासाठी हा विडिओ नक्की बघा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा