सध्या शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदार, मंत्र्यांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी सुरू आहे. एकीकडे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे शिवसैनिकांना एकत्र जमवत शहराशहरात मेळावे घेऊन बंडखोर आमदारांना इशारे देतायत. त्यांना धमक्या देतायत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे आता पुन्हा एकदा बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. एकीकडे भावनिक आवाहन करायचं आणि दुसरीकडे धमक्यांची भाषा करायची याच दुटप्पी भूमिकेमुळे मेळाव्यात जमलेल्या शिवसैनिकांना सुद्धा संभ्रम झाला असेल की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कुठलं वक्तव्य खरं मानायचं की संजय राऊत म्हणतात त्यानुसार वागायचं.