शहीद राजगुरु यांचा हा क्रांतिकार विचार आजच्या सामंतशाही, जात, वर्ग, पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी पिढ्या न पिढ्या ऊर्जा देत राहील.भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांनी जरी सोबत क्रांती चे स्वप्न पाहिलेले असले किंवा सोबत क्रांतीची पताका आपल्या खांद्यावर घेऊन हसत हसत फ़ासावर चढ़त या देशा साठी बलिदान दिलं. भगतसिंग आणि सुखदेव यांचे नाव राजगुरूशिवाय अपूर्ण आहे. शहीद वीर राजगुरू हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. 24 आॅगस्ट ही क्रांतिकारक राजगुरू यांची जयंती. त्या निमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा घेतलेला हा आढावा