भारताच्या चौदाव्या उपराष्ट्रपतीपदी एनडीएचे उमेदवार जयदीप धनकड यांची निवड झाली. येत्या ११ ऑगस्टला धनकड उपराष्ट्रपतीपदावर विराजमान होणार आहेत. त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना तेथील हिंदूंसाठी महत्वाची भूमिका बजावली होती. हिंसाचार झाला तेव्हा पश्चिम बंगालच्या अनेक नागरिकांनी आसाममध्ये पलायन केलेले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी या नागरिकांना आपल्या राज्यात संरक्षण दिलेले. मात्र बंगाली नागरिकांनी आपल्या राज्यात पुन्हा परतावं यासाठी बंगालचे राज्यपाल जयदीप धनकड प्रयत्न करत होते.