या व्हिडिओमध्ये, एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या सर्व्हेबद्दल विश्लेषण केले आहे. या सर्व्हेमध्ये ३ महत्वाचे आकडे आपल्याला बघायला मिळतात.
१. एनडीएला मतदान करणार सांगणारे.
२. मोदींची लोकप्रियता.
३. मोदींना पर्याय असलेले विरोधी नेते.
या सर्व्हेनुसार, ५८% नागरिक एनडीएला मतदान करणार. त्याचबरोबर कोविड-१९, लॉकडाऊन आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम अशी अनेक संकटे देशावर आली असतानाही नरेंद्र मोदींची लोकप्रियता ७१% आहे. जगभरात अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पसह अनेक नेत्यांना कोविड-१९ चा राजकीय फटका बसला आहे. त्या उलट भारतात मात्र मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मोदींना पर्याय कोणता विरोधी नेता ठरू शकतो,या मुद्द्यावर ५०% नागरिकांनी मोदींना सध्या पर्यायच नाही असे सांगितले. त्या नंतर २५% नागरिकांनी राहुल गांधी हे पर्याय ठरू शकतात असे सांगितले. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींसाठी चिंतेची बाब म्हणजे २१% नागरिकांची पसंत आहेत. या दोन नेत्यांमध्ये फक्त ४% फरक उरला आहे.
मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेचे कारण जर लवकरच विरोधी पक्षांना कळले नाही तर त्यांना निवडणूक जिंकणे अवघड होईल.