पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना राज्यसभेत भाषण केले. या भाषणामध्ये मोदींनी देशातल्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. पण त्यातही महत्वाचा मुद्दा हा शेतकरी आंदोलनाचा होता. साधारण ७० मिनिटांच्या भाषणातील २५-३० मिनिटे मोदी कृषी सुधारणा कायद्यांबद्दल बोलले. यामध्ये त्यांनी हरितक्रांतीच्यावेळी लालबहादूर शास्त्रींना झालेला विरोध ते युपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या विषयांवर लिहलेले त्यांचे विचार आणि तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना याच सुधारणा करण्यासाठी पाठवलेले पत्र यांचाही उल्लेख केला.
मोदींनी त्यांच्या भाषणातून माजी पंतप्रधान आणि मोठे शेतकरी नेते चरण सिंग यांच्या भाषणाचाही उल्लेख केला. त्यामध्ये चरणसिंग यांनीच स्वतः असे सांगितले होते की, “अल्पभूधारक शेतकरी हा शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करू शकत नाही.” चरणसिंग यांनी १९७१ मध्ये ५१% शेतकरी अल्पभूधारक असल्याचे सांगितले होते. आता तीच संख्या ७१% झालेली आहे. असे मोदींनी सांगितले.
शरद पवार कृषिमंत्री असताना ज्या कायद्याचं समर्थन ते करत होते आज त्याचा विरोध का? हा यु-टर्न का घेतला? असा सवालही मोदींनी शरद पवार यांना केला.
याच विषयावरचा आमचा हा व्हिडिओ नक्की बघा.