ठाकरे सरकार हे कोसळण्याच्या मार्गावर आहे. तर शिवसेनेतच उभी फूट पडल्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. पण या दरम्यान शिवसेनेने सपाटा लावला आहे तो कार्यकर्ता मेळाव्यांचा. शिवसेनेकडून शहरा-शहरात मेळावे आयोजित केले जात आहेत. शिवसैनिकांना जमवण्याचा प्रयत्न केला होतोय. पण यानंतर चर्चा आहे ती अनेक प्रश्नांची. प्रश्न विचारले जातायत ते म्हणजे आता हे मेळावे घेऊन काय होणार आहे? मेळावे घेण्याची ही योग्य वेळ आहे का?