आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. त्यांना क्लीन चीट मिळाली आहे, कारण पोलिसांनी न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला आहे. या क्लोजर रिपोर्टमुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारच्या काळात कसा यंत्रणेचा आणि सत्तेचा गैरवापर होत होता हे समोर आलं आहे.