दिल्लीमध्ये २६ जानेवारीला मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड झाली. या हिंसाचाराला पूर्णपणे आंदोलक संघटना जबाबदार होत्या. या संघटनांच्या नेत्यांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामध्ये राकेश तिकैट, उग्रहण आणि योगेंद्र यादव यांचा समावेश आहे. यातील योगेंद्र यादव यांच्यावर हा व्हिडिओ करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये दिल्लीत प्रत्येकवेळी हिंसाचार झाल्यावर योगेंद्र यादव कसे काय उपस्थित असतात? असा सवाल उपस्थित केला गेला आहे. दिल्लीमध्ये २०२० मध्ये २ हिंसक घटना झाल्या. जेएनयूमध्ये अराजकवाद्यांना आश्रय देण्यात आला होता, त्यामुळे पोलिसांना जेएनयूमध्ये शिरून या अराजकवाद्यांना पकडणे भाग होते. परंतु डाव्या विद्यार्थी संघटनांनी या अराजकवाद्यांना संरक्षण दिले होते. त्यामुळे तिथे पोलिसांना बलप्रयोग करावा लागला. या प्रकरणातसुद्धा योगेंद्र यादव तिथे उपस्थित होते. शाहीनबाग आंदोलनानंतरही दिल्लीमध्ये दंगली उसळल्या होत्या. यामध्ये अनेक पोलिसांचीदेखील निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. याहीवेळी योगेंद्र यादव सामील होते. आता दिल्लीतील हिंसाचारानंतरसुद्धा योगेंद्र यादव आंदोलकांमध्ये समाविष्ट होते.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर योगेंद्र यादव कोण आहे? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय? त्यांची राजकीय विचारसरणी काय? या विषयांवर हा व्हिडिओ बनवला आहे.