देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अहिंसेचा वाटा असला तरी तो तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडवलं, तुरुंगवास भोगला. क्रांतिकारकांच्या बलिदानातून, अनेक कुटुंबांच्या राखरांगोळीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण क्रांतिकारकांचे हे बलिदान कधीच अशा प्रकारे समोर आले नाही. किंबहुना गेल्या अनेक वर्षे ते दुर्लक्षितच ठेवले गेले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगाच्या अँथम गीताची सध्या चर्चा आहे. या गीतात लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. स्वातंत्र्यलढ्यातील विविध क्रांतीकारक व्यक्तींचे योगदान या व्हिडिओमुळे नक्कीच अधोरेखित झाले आहे.