साडेतीन मुहूर्तापैकी एक सण म्हणून दस-याचं महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी श्रीखंडाला सर्वात जास्त महत्त्व असते. या श्रीखंडासाठी लागणाऱ्या चक्क्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशवाडी येथे होते . गणेशवाडी हे चक्का बनवण्यासाठी प्रसिद्ध मानले जाते. गणेशवाडीचा चक्क अज नाही तर कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. गावातील अनेक कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. सुरुवातीच्या काळात गावातील गवळी गावातील दूध एकत्र करून ते चक्का व्यावसायिकांना आणून देत असत. पूर्वी मोठ्या कढईत दूध तापवले जायचे. आता येथे अत्याधुनिक हिटिंग प्लांट आहेत.राज्याच्या विविध भागात चक्का पोहचवणाऱ्या गणेशवाडीचा या व्हिडीओ मधून घेतलेला धांदोळा…