आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन म्हणजे फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. याला फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची हेकेखोर वृत्ती कारणीभूत आहे. कार्यकाळ संपल्यानंतरही ते या पदावर चिकटून राहिल्यामुळे ही वेळ संघटनेवर ओढविली आहे.