आपण व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर दिवस रात्र आपला वेळ घालवतो. यामध्ये आपल्याला साथ देतात ते म्हणजे ईमोजी. या चॅटिंगच्या दुनियेत ईमोजीचा महत्वाचा रोल आहे. शब्दात व्यक्त न होता ईमोजी पाठवून व्यक्त होणं सगळ्यांना सोप्प जात. याच इमोजीच महत्व लक्षात घेऊन १७ जुलैला जागतिक ईमोजी दिन साजरा केला जातो.