मढ, मार्वे येथील अनधिकृत स्टुडिओ पाडण्यास सुरुवात झाली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर या कामाला सुरुवात झाली खरी पण मविआच्या काळात त्या स्टुडिओंना संरक्षण मिळाले होते. अस्लम शेख यांची या स्टुडिओच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका होती. पण अखेर हातोडा पडलाच.