अण्विक क्षमतेने परिपूर्ण असलेली भारतीय पाणबुडी आयएएस अरिहंतवरून प्रथमच डागण्यात आलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरातील लक्ष्य अत्यंत अचूकतेने भेदले. चीन, पाकिस्तान, रशिया, युक्रेन या भागातील तणावग्रस्त आणि युद्धसदृश्य वातावरण बघता ही यशस्वी आण्विक चाचणी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार आहे