भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एखादे वक्तव्य केले की, त्याचे वेगवेगळे अर्थ काढून ते कसे पक्षनेतृत्वावर नाराज आहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. विरोधी पक्ष सध्या हतबल असल्यामुळे गडकरींना गळाला लावण्याचे नसते उद्योग सुरू झाले आहेत.