‘या आंदोलनजीवींपासून सावध राहा!’

Beware of these Aandolanjeevis | 'या आंदोलनजीवींपासून सावध राहा!'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना राज्यसभेत भाषण केले. या भाषणामध्ये मोदींनी देशातल्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. मोदींनी या भाषणामध्ये एक नवीन शब्द वापरला, तो म्हणजे आंदोलनजीवी. आंदोलनजीवी हे परजीवीही असतात असेही त्यांनी सांगितले. आंदोलनजीवी कोण? आंदोलन करणारे सगळेच आंदोलन जीवी असतात का? आंदोलनजीवी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये फरक काय? या सगळ्यावर भाष्य करणारा हा आमचा विडिओ नक्की बघा….

आपल्या देशात श्रमजीवी, बुद्धिजीवी जसे आहेत त्याच बरोबर सध्या अनेक ‘आंदोलनजीवी’ सुद्धा आले आहेत. हे आंदोलनजीवी संपूर्णपणे परजीवी असतात. इतरांच्या आंदोलनावर आपली राजकीय आणि आर्थिक गरज हे आंदोलनजीवी भागवत असतात. अशा आंदोलनजीवींपासून आपण सावध राहायला हवे. असे नरेंद्र मोदींनी देशवासीयांना चेतावले. नजीकच्या काळात भारतात अनेक आंदोलने झाली यामध्ये शाहीन बागमधील सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलन आणि आत्ता सुरु असलेले शेतकरी आंदोलन ही दोन मोठी आंदोलने झाली. यातील एक आंदोलन नागरिकता कायद्याच्या आणि एक आंदोलन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात होते. या दोन मुद्द्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पण या दोन्ही आंदोलनांमागे एकाच प्रकारचे आणि एकाच विचारधारेचे लोक होते.

योगेंद्र यादव यांच्यापासून ते स्वरा भास्कर यांच्यापर्यंतच्या सर्व आंदोलनजीवींना जाणून घ्या

Exit mobile version