कमी उत्पन्न असलेल्या कामगारांनाच यापुढे अटल पेन्शन असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेन्शनची सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २०१५ मध्ये अटल पेन्शन याेजना सुरू केली हाेती. या याेजनेत आता केंद्र सरकारने माेठा बदल केला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता प्राप्तिकर भरणारे करदाते या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. सरकारने जारी केलेला हा आदेश १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार आ हे. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या कामगारांनाच यापुढे अटल पेन्शनचा लाभ घेता येणार आहे .अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार नवीन तरतुदीनुसार, जर एखादी व्यक्ती १ ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर या योजनेत सामील झाली असेल आणि नवीन नियम लागू होण्याच्या तारखेला किंवा त्यापूर्वी ती भरत असल्याचे आढळले तर त्याचे खाते त्वरित बंद केले जाईल आणि तोपर्यंत जमा केलेली पेन्शनची रक्कम परत केली जाईल.