चौद वर्षांनंतर पुन्हा मुंबईला हादरवण्याचा कटकारस्थान दहशतवादी करण्याच्या तयारीत आहेत का? काही दिवसांपूर्वी कोकणातील हरिहरेश्वर येथे बोट सापडली. त्यात हत्यारं होती. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम, महाराष्ट्राच्या ट्रॅफिक कंट्रोल नंबरवर आलेला धमकीचा फोन, शिर्डीत अतिरेक्याला झालेली अटक. या सर्व घटनांमुळे मुंबईवर दहशतवादी हल्ले होऊ शकतात का? गुप्तचर यंत्रणांना असे कोणते अलर्ट मिळाले आहेत का? याच पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचीत घटना घडू नये, यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर आले होते का?