शिवसेनेतून मोठ्या संख्येने आमदार, खासदार, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ लागल्यानंतर शिवसेना पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे याच्या चर्चेबरोबरच आता शिवसेना भवन कुणाचे हाही सवाल उपस्थित होत आहे. याचे उत्तर येत्या काळात मिळेल. पण ते बहुमताच्या आधारे मिळणार का?