देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर पुरस्कार वापसीची एक मालिका सुरू झाली होती. हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर अचानक लोकशाहीची गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जाऊ लागला. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी शिंदे-फडणवीस यांच्या हातून पुरस्कार घ्यायला नकार दिला आहे.