आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्रात दौरे करत आहेत. यावेळी ते गद्दार यावरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर टीका करत आहेत. पण आता गद्दार या मुद्द्यावरून ते पुढे कधी जाणार असा सवाल विचारला जात आहे. आदित्य ठाकरे या आमदारांना गद्दार म्हणत असले तरी त्यांनी अजूनही दरवेळी ठाकरे कुटूंबियांबद्दल आदरच दाखवलेला आहे. मात्र, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्या सहनशीलतेची मर्यादा आता भंग करत आहेत.