शुक्रवार देशातील मुस्लीमांना आंदण दिला आहे, असा एमआयएमचे माजी खासदार इम्प्तियाज जलील यांचा गैरसमज झालेला दिसतोय. कारण, ‘महाराष्ट्रातील सरकार जाणीवपूर्वक जुम्म्याच्या दिवशी हिंदूंच्या मोर्चानां परवानगी देते. या मागील हेतू स्वच्छ दिसत नाही’, असे विधान यांनी केलेले आहे. हिंदू आक्रोश मोर्चावर झालेल्या दगडफेकीनंतर ते बोलत होते. मुस्लीमांमधील कट्टरवादी गाझामध्ये माशीं शिंकली तरी रस्त्यावर उतरत असतात, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात हिंदू रस्त्यावर उतरले म्हणून जलील यांना मिर्च्या लागण्याचे कारण नाही. जय श्रीरामच्या घोषणा, वंदे मातरमच्या घोषणा ऐकून मुस्लीम चिडले म्हणे; या घोषणा ऐकून ज्यांच्या बुडाला आग लागते, त्यांच्यासाठी १९४७ साली पाकिस्तान दिलेला आहे. भारतातील हिंदू यापुढे जिहादींना सहन करणार नाही, हे कट्टरवाद्यांनी कुणी तरी ठामपणे सांगण्याची गरज आहे.