छत्तीसगड मध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २२ जवानांनी आपले प्राण गमावले, ३३ जवान गंभीर जखमी झाले आणि परत एकदा नक्षलवादाचा प्रश्न ऐरणीवर आला. या नक्षलवादाला किंवा नक्षलवादी कारवायांना एक मोठा इतिहास आहे. बंगाल मधील नक्सलबारी मधून जरी नक्षलवादी चळवळीला सुरवात झाली असली तरी त्याची मूळं १९४८ सालातल्या चळवळींमध्ये आहे. हे नक्षलवादी नेमके कसे तयार झाले? त्यांचा इतिहास काय आहे? त्यांची काम करायची पद्धत काय आहे? याविषयी या व्हिडिओ मधून सांगण्यात आले आहे.