मुस्लीम मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीत एकगठ्ठा मते देशभरात इंडी आघाडीच्या पारड्यात टाकली. महाराष्ट्रात मविआची सरशी झाली त्यात या मतांचा मोठा हात आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीमांना प्रतिनिधीत्व देण्यात आले नसल्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी हा मुद्दा ऐरणीवर येणार हे नक्की. तशी कुजबुज पुन्हा सुरू झालेली आहे. मुस्लीमांना लोकसंख्येच्या तुलनेत जागा हव्या, असा दावा काँग्रेसच्या बुजुर्ग नेत्याने केलेला आहे.