महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे ती तरुणी धनंजय मुंडे यांची नातेवाईक आहे. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या विवाहबाह्य संबंधांचा खुलासा केला.
गेली अनेक वर्षे आपण एका तरुणीबरोबर महिलेबरोबर पती-पत्नी सारखे राहत असून तिच्यापासून आपल्याला दोन अपत्ये झाली आहेत. त्या महिलेला व त्या मुलांना आपण आपले नाव लावण्याची परवानगी दिली आहे तसेच त्यांच्या पालनपोषणाची ही जबाबदारी उचलली आहे असा कबुलीजबाब धनंजय मुंडे यांनी दिला.
मात्र आपल्याकडे बायकोची सामाजिक व्याख्या अतिशय सरळ आहे. सत्यनारायणाच्या पूजेला उजव्या हाताला बसते ती बायको.
बलात्काराचा आरोप करणारी तरुणी हि त्या महिलेची सख्खी धाकटी बहिण असून हा आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचा बचाव त्यांनी त्या पोस्ट मधून केला.
आपल्या विवाहबाह्य संबंधांचा खुलासा आपण सोशल मीडियातून केला म्हणजे तो माफीनामा होत नाही असं विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
या सगळ्या प्रकरणात निवडणूक आयोग काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत कारण धनंजय मुंडे यांनी निवडणूक अर्ज भरताना प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केलेली माहिती सपशेल खोटी आहे असा आरोप विरोधकांनी करून त्यांची आमदारकी रद्द करावी यासाठी जोर लावला आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे “सामाजिक न्याय” खाते असल्यामुळे तो अधिकच टीकेचा विषय झाला आहे.
अर्थात भारताच्या राजकारणात विवाहबाह्य संबंध हा विषय नवीन नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त उर्फ एन डी तिवारी यांचं प्रकरण थेट न्यायालयात जाण्यापर्यंत गाजलं होतं. तिवारी यांना विवाहबाह्य संबंधातून झालेल्या मुलाने तिवारी यांनी आपले पितृत्व स्वीकारावे म्हणून न्यायालयाकडे धाव घेतली होती. सुरुवातीला तिवारी यांनी कानावर हात ठेवले, खूप टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला परंतु डी एन ए टेस्ट साठी त्यांनी आपलं सँपल द्यावं असा न्यायालयाने आदेश देताच तिवारी यांनी त्या तरुणाचे पितृत्व स्वीकारले.
भारताच्या राजकारणात अजून अशी अनेक उदाहरणे देता येतील परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक उदाहरण मात्र विशेष उल्लेखनीय आहे.
देव न मानणाऱ्या कम्युनिस्टांचे दैवत काल मार्क्स यांचे.
जेनी नावाच्या आपल्या पत्नीपासून काल मार्क्स यांना एकूण सात अपत्ये झाली परंतु त्यातली तीन मुली बचावल्या. कार्ल मार्क्स यांच्या घरी हेलन नावाची एक मोलकरीण होती. तिच्यापासून काल मार्क्स यांना एक मुलगा झाला परंतु त्याचे पितृत्व स्वीकारण्याची हिम्मत मार्क्समध्ये नव्हती. त्यांना समाजातील आपल्या प्रतिमेची काळजी होती. त्या मुलाचं नाव हेन्री फेड्रिक ठेवण्यात आलं. त्याच्या जन्माच्या दाखल्यावर वडिलांच्या नावाचा रकाना रिकामा ठेवण्यात आला होता. आश्चर्य म्हणजे काल मार्क्सच्या जीवश्चकंठश्च फ्रेडरिक एंजल्स या मॅंचेस्टरला राहणाऱ्या अविवाहित मित्राने हेन्री फ्रेड्रिक पितृत्व स्वीकारलं.
या मुलाच्या जन्मानंतर त्याला लंडनच्या लुईस नावाच्या एका कामगाराच्या घरी ठेवण्यात आलं तिथेच त्याचा पालन-पोषण झालं. पुढे तो कामगार झाला.
काल मार्क्सच्या मुलींना हेन्री फ्रेडरिक लुईस हा आपला भाऊ असल्याचे फ्रेड्रिक एंजल्सकडून कार्ल मार्क्सच्या मृत्यूनंतर कळले.
मात्र आजही कागदोपत्री पुरावे नसल्यामुळे जगभरातले कम्युनिस्ट या प्रकरणाबाबत एन डी तिवारीसारखे कानावर हात ठेवतात. परंतु सर्व परिस्थितीजन्य पुरावा हेलनला झालेले अपत्य हे काल मार्कसचेच होते असे अनेक इतिहासकारांचे ठाम मत आहे.
काहीही असेल पण हेलनच्या बहिणीने काल मार्क्सवर कधीच बलात्काराचा आरोप केला नाही हे मात्र खरं.