बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी आज ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. इंडी आघाडीने त्यांच्या विरोधात के.सुरेश यांना उमेदवारी दिली होती. परंतु आवाजी मतांनी बिर्ला यांची निवड झाल्यानंतर विरोधकांनी मत विभाजनाची मागणी केली नाही. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर केंद्रातील सत्तेच्या चाव्या पूर्णपणे भाजपाच्या हाती आहेत, हे स्पष्ट झाले. पहील्याच भाषणात लोकसभा अध्यक्षांनी देशावर आणीबाणी लादण्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत दिवंगत पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्या लोकशाही बुडव्या कृत्याचा सभागृहाच्या वतीने निषेध केला आणि संविधान वाचवण्याच्या बाता करणाऱ्य विरोधकांना आरसा दाखवला.