या व्हिडियोमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळापासूनच्या भारत-चीन संबंधांवर भाष्य केले आहे. त्याबरोबरच नेहरूंच्या काळात चीनबाबतची धोरणे आणि आत्ताच्या काळात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सशक्त भारताने चीन बाबत घेतलेल्या भूमिकेवर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी या व्हिडियोमार्फत नेहरूंच्या काळातील चूकांवर गंभीर टिका केली आहेच, शिवाय सध्याच्या विरोधी पक्षांवर देखील निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींनी सैन्याच्या सबलीकरणामुळे चीन प्रश्न हाताळताना झालेला फायदा सांगितला आहे.