गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात खास करून दक्षिण महाराष्ट्रात विषय गाजतो आहे तो विशालगडवरील अतिक्रमणाचा. या अतिक्रमण विरोधातील भूमिकेमुळे छत्रपती संभाजीराजे चर्चेत आले. या वरून तिथे तणाव होता. गजापूर परिसरात अल्पसंख्यांक समाजाच्या घरावर हल्ला झाला. मुळात या हल्याचे समर्थन कोणी केले नाही. याबद्दल पोलीस तपास करत आहेत. आजच अटकसुद्धा झाली आहे. मात्र यानंतर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले ते कशासाठी ? का त्यांना भारताच्या संविधानावर, कायद्यावर आणि पोलिसांवर विश्वास नाही का ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो.