देशात सुमारे १३ हजार ५०० कोटींचा बँक घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती मेहुल चौक्सी याला बेल्जिअममध्ये अटक करण्यात आलेली आहे. भारता सरकारने त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रीया सुरू केलेली आहे. चोक्सी भारतातून पळाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपावर तोफा डागल्या होत्या. कारण केंद्रात भाजपाचे सरकार होते. भाजपाने त्याला पळून जाण्यासाठी मदत केली. सरकारच्या अकार्य़क्षमतेमुळे त्याला परत आणणे शक्य होत नसल्याचा दावाही काँग्रेस नेत्यांनी केला. वस्तूस्थिती वेगळी होती. चोक्सीचे सबंध कोणाशी होते, याचा खुलासा तो अँटीग्वात असतानाच झाला.