पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबा यांचे आज पहाटे निधन झाले. वयाची शंभरी गाठलेल्या व्यक्तीचे निधन दुर्दैवी किंवा दु:खद अजिबातच नाही. जन्माप्रमाणे मृत्यूही जगरहाटीचा भाग आहे. हिराबा शांत झाल्या त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम’, या शब्दांत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांना हिराबांच्या आय़ुष्यात शानदार काय होते, याचा उलगडा झालेला नाही.