मंत्र शक्तीचे रहस्य काय?

What is a Mantra?| मंत्र शक्तीचे रहस्य काय?

आपल्याला आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यायला लागते. विशेषतः २०२० हे वर्ष आपणा सर्वांसाठी कोविड-१९ महामारीमुळे अधिक खडतर ठरले आहे. आता कोविड-१९च्या महामारीतून उभे राहणाऱ्या आपणा सर्वांसाठी अतुल महाजन गुरूजी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत.

जीवनात आपण अनेकदा मंत्र पठण करतो. सामान्यतः प्रातःकाळी एखाद्या स्तोत्र पठणाची परंपरा देखील काही घरांमध्ये असते. मात्र मंत्र- स्तोत्र यांत नेमका फरक काय? शस्त्रात मंत्रांची व्याख्या काय आहे? मंत्रांचे फायदे नेमके कसे होतात? अधिकाधीक फायदा करून घेण्यासाठी कोणते मंत्र म्हणावेत? याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला अतुल महाजन गुरूजी देत आहेत.

याबरोबरच स्तोत्रांबद्दल देखील त्यांनी सांगितलं आहे. त्याशिवाय काही स्तोत्र हे मंत्र देखील असतात. उदा. रामरक्षा! त्यामुळे रामरक्षेतील अक्षरन् अक्षर एका विशिष्ट रचनेतून करण्यात आले आहे. संपूर्ण रामरक्षा नाही म्हटली तरी, एखादा मंत्र देखील लाभदायक ठरू शकतो. त्यामुळे स्तोत्र पठणाबद्दल देखील अधिक माहिती आपल्याला महाजन गुरूजींनी या व्हिडियोच्या माध्यमातून दिली आहे. त्याबरोबर काही मंत्र देखील उदाहरणादाखल सांगितले आहेत जे सामान्य माणूस त्याच्या आयुष्यात वापरू शकतो. ते सिद्ध केलेले मंत्र आहेत. ते कोणते?

अशा सर्वांबाबत माहितीसाठी मंत्रशक्तींचे रहस्य सांगणारा हा व्हिडियो नक्की पहा.

Exit mobile version