अंगणवाडीमध्ये शिक्षिकांच्या भरतीसाठी कन्नडसोबत उर्दू आलेच पाहीजे असा फतवा कर्नाटक सरकारने काढला. या फतव्याचे टायमिंग जबरदस्त आहे. दोन महीन्यावर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका असताना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा निर्णय घ्यावा, हा काही योगायोग नाही. कर्नाटकमध्ये ज्यांच्या मतावर निवडून आले त्यांच्या उपकाराची परतफेड तर आहेच, शिवाय महाराष्ट्रातील मुस्लीम मतदारांना या निमित्ताने काँग्रेसने डोळा मारण्याचा प्रय़त्न केला आहे. जातीच्या नावावर हिंदूंची मतं मिळवायची आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र केवळ मुस्लीम हिताचा अजेंडा रेटायचा ही काँग्रेसची भूमिका या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेली आहे.