कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या प्रकरणात पहीली विकेट गेली आहे. हे गाव अलिबागेतील मरुड तालुक्यात येते. याप्रकरणी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक झाली आहे. बंगल्यांची घरपट्टी ठाकरे आणि वायकर यांच्याकडून भरली जात होती. परंतु हे बंगले अचानक गायब झाले. या प्रकरणात कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी माजी सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.