विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आहे. त्यामुळे महायुती सरकारने लोकोपयोगी निर्णयांचा धडाका लावला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यात मुंबईतील पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलबंदीच्या निर्णयासह अनेक लोकोपयोगी निर्णयांचा समावेश आहे. परंतु राज्य सरकारने मदरशांच्या शिक्षकांच्या पगारात तिप्पट वाढ करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. एकीक़डे जिहादी तत्त्वज्ञान शिकवत असल्याचा ठपका ठेऊन उत्तर प्रदेश आणि आसाम सरकारने मदरशांना टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला असताना मदरशांना बळ देऊन हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारला पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची बुद्धी का व्हावी असा सवाल अनेकांना पडला आहे.