आर्यन खान ड्रग्स केसमध्ये समीर वानखेडे हे नाव सातत्याने समोर येत होते. याच समीर वानखेडे यांच्या नावाने महाराष्ट्राचे मंत्री पत्रकार परिषदांमधून बोंबा मारत सुटले होते. याच पत्रकार परीषदांमधून समीर वानखेडे यांच्यावर असंख्य आरोप झाले आणि त्याच बरोबर नवाब मलिक यांनी आपली पातळी सोडून समीर वानखेडेंच्या कुटुंबावरही आरोप करण्याचे सत्र सुरु केले. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पात्र लिहले आहे.