पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणाला आज एक वेगळे वळण लागले. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आज मुंबई पोलिस आज मुंबई पोलिस मुख्यालयात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लिखित तक्रार दिलेली आहे. या तक्रारीतील तपशील स्फोटक आहे. यात ड्रग्ज आहेत, लहान मुलांच्या शोषणाचा उल्लेख आहे. सर्वसामान्य व्यक्तिचा मेंदू गरगरेल अशा प्रकारचे आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत. दिशा सालियनच्या मृत्यू मागे असलेल्या काळ्या कारवाया किती गडद होत्या त्याचा उलगडा या तक्रारीतून होतो आहे.