भारतीय शेक्सपिअर, कविकुलगुरू अशी ज्या कालिदासाची ओळख आहे त्याच्या ‘मेघदूत’ या अजरामर काव्यात आषाढाच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख आहे. या महाकवीच्या सर्वात अनोख्या कलाकृतीतील हा दिवस संस्कृत रसिकांनी कालिदास दिन याच नावाने अजरामर केला. गेली कित्येक शतके केवळ भारतीयांच्याच नाही तर जगातील अनेक कवींच्या प्रतिभेला आव्हान देणारी, प्रत्येक भारतीयाला आपलीशी वाटणारी मेघदूत ही कलाकृती काय आहे? अनेक शतके या कलाकृतीचे गारुड का आहे? त्याबरोबरच ज्या देववाणी संस्कृत भाषेत या साहित्याची निर्मिती झाली ती भाषा या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा एक प्रयत्न या मुलाखतीत केला आहे.