राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांचे नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन झाले आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटील यांनी असंसदीय शब्द वापरल्याचा आरोप आहे. नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांना बोलू दिले जात नाही, असे म्हणत गदारोळ करण्यात आला. त्यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभा सभापती राहूल नार्वेकर यांच्याविषयी असंसदीय शब्द काढले. यावरून त्यांच्या निलंबनाची मागणी केली गेली आणि तसे ते निलंबन केले गेले. अधिवेशनाच्या काळात त्यांच्यावर हे निलंबन करण्यात आले आहे. म्हणजेच हे अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील सभागृहात येऊ शकत नाहीत.