लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनापेक्षा खासगी विदेश दौऱ्याचे कौतूक वाटते. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला सहा महीन्यावर आलेल्या बिहार निवडणुकांच्या तयारीपेक्षा विदेशात वेळ घालवणे अधिक महत्वाचे वाटते. हे सगळे अकल्पनीय आहे. देशात महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत असताना, त्यांच्याकडे पाठ फिरवून काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक गायब का होतात? याचे अनेकांना कोडे आहे. गेल्या तीन महीन्यात राहूल गांधी दुसऱ्यांदा व्हीएतनामला गेलेले आहेत.